• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रेल्वे रुळावर काय करत होती ही महिला? समोरून आली फास्ट लोकल...
  • VIDEO : रेल्वे रुळावर काय करत होती ही महिला? समोरून आली फास्ट लोकल...

    News18 Lokmat | Published On: Mar 9, 2019 05:59 PM IST | Updated On: Mar 9, 2019 05:59 PM IST

    मुंबई, 09 मार्च : 'रेल्वे रुळ ओलांडू नका' अशी वारंवार सुचना केली जाते. परंतु, प्रवासी याकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी रात्री 11.30 वाजता घडली आहे. एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती, तितक्यात सीएसटीएमकडे जाणारी फास्ट लोकल आली. या महिलेने लगेच प्लॅटफाॅर्मवर उडी मारली. लोकलच्या मोटरमननेही या महिलेला वाचवण्यासाठी लोकलचा स्पीड कमी केला. पण, या महिलाला लोकलची धडक बसली. सुदैवाने लोकलाच वेग कमी केल्यामुळे ही महिला लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्या फडीत अडकली गेली. तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेऊन या महिला बाहेर काढलं. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली. हा सगळा प्रकार सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी