• Home
  • »
  • News
  • »
  • video
  • »
  • #Mumbai26/11 : कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या देविकाला भेटायचंय मोदींना!

#Mumbai26/11 : कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या देविकाला भेटायचंय मोदींना!

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला १० वर्षं पूर्ण होत आहे. २६ नोव्हेंबर 2008 ला मुंबईत १० दहशतवाद्यांनी निष्पापांची कत्तल करत हाहाकार माजवला होता. यामध्ये १६४ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. आजच्या दिवशीच म्हणजे २१ नोव्हेंबर 2012 रोजी क्रूरकर्मा अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आलं होतं. दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत दहशतवादी कसाब होता. जगातली ही पहिली घटना होती. पण कसाबला फासापर्यंत पोहोचवण्याच्या कामात मोलाची भूमिका बजावली ती देविका रोटावन या तरुणीने. त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती. आम्ही देविकाला भेटलो आणि तिची कहाणी जाणून घेतली. गेल्या १० वर्षांतला तिचा अनुभव तिच्याच शब्दांत...

  • Share this:

    First published: