• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाबळेश्वर परत गोठलं; दवबिंदूंचे झाले हिमकण
  • VIDEO : महाबळेश्वर परत गोठलं; दवबिंदूंचे झाले हिमकण

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2018 06:21 PM IST | Updated On: Dec 29, 2018 06:27 PM IST

    महाबळेश्वर, 29 डिसेंबर : महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. प्रसिद्ध वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदूंचं हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचं पहावयास मिळत आहे. वेण्णालेक जेट्टीसह वाहनांच्या टपांवर, दुचाकींच्या सीट, हिरवळीवर, पाना-फुलांवर आणि स्ट्रॉबेरीच्या रोपांवर हिमकण जमा झाल्याचं सद्या येथे पहावयास मिळत आहे. याच महिन्यामध्ये पंधरा दिवसांपूर्वी अशाचप्रकारे दवबिंदूंचे हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचे पहावयास मिळाले होते. महाबळेश्वरचं पार परत एकदा खाली आला असून, महाबळेश्‍वरध्ये हिमकण जमा होण्याची याच महिन्यातील ही दुसरी घटना आहे. महाबळेश्वर नगरी सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून, सलग आलेल्या सुट्टयांमुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी येथे पहावयास मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी