• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गायीच्या धडकेनं मोहन भागवतांच्या ताफ्यातील स्कार्पिओ उलटली
  • VIDEO : गायीच्या धडकेनं मोहन भागवतांच्या ताफ्यातील स्कार्पिओ उलटली

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 07:22 PM IST | Updated On: May 16, 2019 07:22 PM IST

    महेश तिवारी, चंद्रपूर,16 मे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज चंद्रपूरवरून नागपूरकडे जात असताना त्याच्या ताफ्यातल्या पहिल्या वाहनाला अपघात झाला. नंदुरी गावाजवळ एका गायीला धडक दिल्यानं हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. या घटनेत सुरक्षा ताफ्यातला जवान जखमी झाला. जवानाला सुरक्षित उपचारासाठी रुग्णालयात पाठवेपर्यंत स्वतः मोहन भागवत तिथे थांबले होते. यादरम्यान मोहन भागवत यांना सुखरूप नागपूरला पोहोचवण्यात आलं असून जखमी जवानाला वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावरील स्कार्पिओ कार बाहेर काढण्यात आली असून बाकीच्या सर्व ताफ्याना सुखरूप नागपूरला रवाना करण्यात आले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading