मुंबई, 23 जानेवारी : पक्षाला नवीन दिशा देण्यासाठी मुंबईत मनसेचं महाअधिवेशन पार पडलं. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्त्वाची भूमिका हाती घेत पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना हुसकावून लावा, अशी भूमिका घेतली आहे. पुढील महिन्यात 9 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढणार असल्याचंही राज ठाकरेंनी जाहीर केलं.