पुणे, 02 ऑक्टोबर : माझ्या पाठीत खंजीर जरी खुपसला तरी माझी पक्षावरची निष्ठा ढळणार नाही, अशी खदखद मेधा कुलकर्णींनी या मेळाव्यात चंद्रकांत पाटलांसमोरच बोलून दाखवली. चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. आपल्या भाषणात मेधा कुलकर्णी भावूक झाल्या. चंद्रकांत दादा पाटील कोथरूडमधून बहुमतानं निवडून येतील, असं विश्वास त्यांनी व्यक्त केला.