• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठा आरक्षणाच्या कायद्याच्या लढाईला सुरूवात
  • VIDEO : मराठा आरक्षणाच्या कायद्याच्या लढाईला सुरूवात

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 09:23 PM IST | Updated On: Dec 3, 2018 09:24 PM IST

    मुंबई, 3 डिसेंबर :राज्य सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकामुळं मराठा समाजाला मिळालेल्या 16 टक्के आरक्षणाविरोधात, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातली आरक्षणाची टक्केवारी 50 च्यावर गेली असून, हे घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकाकर्ते सदावर्ते यांनी केलाय. तर तिकडे मराठा आरक्षणासंदर्भात कुणी 'खो' घालू नये म्हणून राज्य सरकार आणि मराठा समाजाच्या नेत्यांची देखील धडपड सुरू आहे. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं. तसंच मराठा आरक्षण मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या विनोद पाटलांनी देखील सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading