• होम
  • व्हिडिओ
  • आईसोबत धावती रेल्वे पकडताना 8 वर्षांची चिमुकली पडली; अंगावर शहारे आणणारा VIDEO
  • आईसोबत धावती रेल्वे पकडताना 8 वर्षांची चिमुकली पडली; अंगावर शहारे आणणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 04:05 PM IST | Updated On: Mar 11, 2019 04:06 PM IST

    मनमाड, 11 मार्च : देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा प्रत्यय मनमाड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आला. आई सोबत चालती ट्रेन पकडताना 8 वर्षांची चिमुकली खाली पडून प्लॅटफार्म आणि गाडी यांच्यात अडकली. मात्र, एका प्रवाशाने प्रसंगावधान राखून तातडीने साखळी ओढली आणि गाडी थांबवली. तर ड्युटीवर असलेले आरपीएफ आणि कुली यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला बाहेर काढलं. गाडी आणि प्लॉटफॉर्ममध्ये अडकल्याने मुलीला दुखापत झाली आहो. सुदैवाने या अपघातात तिचा जीव वाचला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी