• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नोकरीवरून काढून टाकलं होतं मनजीतला, आज पटकावले सुवर्णपदक
  • VIDEO : नोकरीवरून काढून टाकलं होतं मनजीतला, आज पटकावले सुवर्णपदक

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2018 11:26 PM IST | Updated On: Aug 28, 2018 11:33 PM IST

    आशियाई क्रीडा स्पर्धेत आजच्या दहाव्या दिवशीही भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. धावपटू मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत आपलं सर्वोच्च प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकत नवा विक्रम केला. मनजीत आज आपल्यासाठी हिरो आहे. मात्र ओएनजीसीनं त्याला कामावरून काढून टाकलं होतं. आज आनंदाच्या आणि विजयाच्या क्षणी देखील मनजीतच्या मनात त्या कटू आठवणीची सल कायम आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मनजित सिंगन त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कटू आठवण बोलून दाखवली. मात्र पण मनजितला कामावरून काढून आपण हिरा गमावला याची जाणीव त्या कंपनीला झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच खेळाडूंची अशी उपेक्षा होणार असेल तर क्रीडा क्षेत्रात भारत उत्तुंग कामगिरी तरी कसा करणार असा प्रश्न मनाला शिवल्याशिवाय राहत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी