• होम
  • व्हिडिओ
  • मत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल
  • मत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Nov 21, 2018 12:37 PM IST | Updated On: Nov 21, 2018 12:37 PM IST

    मध्यप्रदेशात प्रचाराची रणधुमाळी शिगेला जाऊन पोहोचलीय. या प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी उमेदवारांना जनतेच्या नाराजीचाही सामना करावा लागतोय. असाच एक प्रकार नागदा जिल्ह्यातील खाचरोद या गावी घडला. इथं भाजप उमेदवार दिलीप शेखावत हे प्रचार करत होते. सोमवारी संध्याकाळी ते आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. मतदारांच्या भेटी गाठी आशीर्वाद घेत असतानाच अचानक एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. नेमकं काय घडलं हे सुरूवातीला कोणालाच कळलं नाही. यानंतर संतप्त झालेल्या आमदारांनी या व्यक्तीला मारहाण केली. या प्रकारामुळं इथं काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी