• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि...
  • VIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि...

    Renuka Dhaybar | News18 Lokmat | Published On: Jun 11, 2018 08:54 AM IST | Updated On: Jun 11, 2018 08:54 AM IST

    सिंधुदुर्ग, 11 जून : मालवणच्या रॉक गार्डनमध्ये पर्यटनाचा आनंद लुटायला गेलेले तीन तरुण केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचलेयत. समुद्र खवळलेला असतानाही रौद्र लाटांसमोर या युवकांची धम्माल मस्ती सुरू होती. या दरम्यानच एका जोरदार लाटेचा तडाखा बसला आणि हे तिघंही लांब फेकले गेले. स्थानिकांनी धावपळ करून बाहेर काढल्यानं त्यांचा जीव वाचला. समुद्र उधाणलेला असताना किनाऱ्यावर जाऊ नका असं बजावण्यात येतं असतानाही या इशा-याकडे दुर्लक्ष करून जाणं अनेकदा जीवावर बेततं. या घटनेत हे तिघे सुदैवी ठरलेत. तेव्हा पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, मात्र स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात न घालता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close