• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सह्याद्रीच्या कुशीत एकच गजर... 'हर हर महादेव'
  • VIDEO: सह्याद्रीच्या कुशीत एकच गजर... 'हर हर महादेव'

    News18 Lokmat | Published On: Mar 4, 2019 07:24 AM IST | Updated On: Mar 4, 2019 07:25 AM IST

    भिमाशंकर (पुणे), 4 मार्च : बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री महापूजा करण्यात आली. रात्री बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विधानसभेचे माजी अध्यक्षआमदार दिलीप वळसे पाटील, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महापूजा पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, ''जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय", "हर हर महादेव" अशा जयघोषात भाविक शिवलिंगाचं दर्शन घेत आहेत. तर महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेलं हे देवस्थान उजळून निघालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी