यवतमाळ, 12 ऑक्टोबर : शिवसेनेनं आपल्या जाहीरनाम्यात 10 रुपयात थाळीची घोषणा केली. या आश्वासनाचा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी खरपूस समाचार घेतला. आधीच्या युती सरकारनं झुणका भाकर केंद्र सुरू केली होती. त्याचं काय झालं. त्या जागांचं काय झालंय ते बघा? अशी टीका आंबेडकरांनी केली. ते यवतमाळमध्ये वंचितच्या प्रचारसभेत बोलत होते.