मुंबई, 30 नोव्हेंबर : विधानसभेत आज महाविकासआघाडी सरकारने विश्नासदर्शक ठराव जिंकला. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी शपथविधी आणि अधिवेशन भरवण्यावर आक्षेप घेतला. त्यांच्या वागणुकीवर राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी अनुभवाचा सल्ला देत चांगलाच टोला लगावला.