मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आज शिवसेना आणि आघाडीची बैठक पार पडली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या घडामोडीवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला याची कबुली दिली.