मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापन करण्यास कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू शकण्यात अपयशी ठरलं आहे. आता राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट करावी अशी शिफारस केली आहे. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रपती राजवट लागू जरी झाली तरी सरकार स्थापन होऊ शकतं असा दावा केला आहे.