बाळासाहेब काळे, पुरंदर, 24 ऑक्टोबर : काँग्रेसचे संजय जगताप यांनी दोन वेळा विजयी झालेले सेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा 31 हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवे ते सासवडपर्यंत जल्लोष पूर्ण मिरवणूक काढण्यात आली होती.फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली.