• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...तर मग भाजपला पंतप्रधानपदासाठी नवीन उमेदवार शोधावा लागेल'
  • VIDEO: '...तर मग भाजपला पंतप्रधानपदासाठी नवीन उमेदवार शोधावा लागेल'

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 10:11 AM IST | Updated On: Mar 13, 2019 11:31 AM IST

    मुंबई, 13 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लोकसभेत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो. परंतु मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केलाय. पवार म्हणाले की, "मला जेवढं राजकारणामधलं कळतं त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे. मी काही ज्योतिषी नाही परंतु भाजपला बहुमत मिळणार नाही. भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्रपक्षाची मदत घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधानपद दुसर्‍या व्यक्तीला द्यावे लागणार," असा अंदाज पवारांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी