• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'साले म्हणणाऱ्या दानवेंना शेतकरी काय असतो ते दाखवून द्या'
  • VIDEO: 'साले म्हणणाऱ्या दानवेंना शेतकरी काय असतो ते दाखवून द्या'

    News18 Lokmat | Published On: Mar 16, 2019 11:59 AM IST | Updated On: Mar 16, 2019 12:02 PM IST

    बारामती, 16 मार्च : बारामती येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपा शिवसेनेवर कडाडून टीका केली. ''साले म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंना शेतकरी काय असतो ते दाखवून द्या,'' असं ते म्हणाले. ''भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी देखील लाखोंचे मराठी मोर्चे निघाले असताना, 'मूक मोर्चा' असं कार्टून काढून टीका केली होती. मराठ्यांचा मूक मोर्चा काय असतो हे त्यांनादेखील दाखवून द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. अजूनही फसवतात, अजूनही बनवतात, अजूनही थापा मारतात. हे सरकार गोरगरिबांचे सरकार राहिलेलं नाही हे मोठ्यांचं सरकार आहे'', असंदेखील अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी