03 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईतून भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपने जाहीर केलेल्या 16 व्या यादीत ईशान्य-मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसैनिकांच्या विरोधानंतर भाजपने सोमय्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला.