• होम
  • व्हिडिओ
  • धुळ्यात अंगाचा थरकाप उडवणाऱ्या ट्रक आणि व्हॅनच्या धडकेचा LIVE VIDEO
  • धुळ्यात अंगाचा थरकाप उडवणाऱ्या ट्रक आणि व्हॅनच्या धडकेचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 05:52 PM IST | Updated On: Mar 12, 2019 06:01 PM IST

    दीपक बोरसे, धुळे, 12 मार्च : राज्य परिवहन महामंडळाच्या महामार्गावरील चुकीच्या थांब्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूर - धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गारील साक्री शहराजवळील अमित प्लाझासमोर बस ट्राला आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात पिकअप चालक सुनील मुसळे जागीच ठार झाला. महामार्गावरील बस थांब्यावर अचानक बस थांबली होती. या उभ्या असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रॉला समोरून येणाऱ्या महिंद्रा पीकअपवर जाऊन धडकल्यानं हा भीषण अपघात झाला. अपघाताचा हा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या महामार्गावर बसचा चुकीचा थांबा असल्याने तो सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी स्थानिक करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी