• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बीडच्या कारागृहात साजरा झाला कृष्ण जन्म सोहळा
  • VIDEO : बीडच्या कारागृहात साजरा झाला कृष्ण जन्म सोहळा

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2018 10:23 PM IST | Updated On: Sep 2, 2018 10:23 PM IST

    बीड, 2 ऑगस्ट : कारागृह आणि तेथील कैदी यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. मात्र, हे कैदी सुद्धा शेवटी माणसंच आहेत, त्यांना सुद्धा भावना आहेत, त्यांनाही सण, उत्सव साजरे करावेसे वाटतात. रविवारी बीडच्या कारागृहात असाच एक आगळा वेगळा कृष्ण जन्म सोहळा पाहायला मिळाला. यावेळी किर्तनकारांनी सादर केलेल्या भारुडाच्या तालावर कैद्यांनी ठेका धरला होता. बीड जिल्हा कारागृहात श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करण्यात आला. श्रावण विशेष कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसांचे जन्मअष्टमीचे कीर्तन तुकाराम महाराज मुंडे यांनी केलं. कृष्ण चरित्र आणी कथा प्रसंग घेतं शेवटी जन्माचे अभंग घेवून फुले उधळण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी