कोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन

कोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन

कोकण म्हणजे गणेशोत्सव...कोकणात गणपती उत्सवाची धूम काही वेगळीच असते.

  • Share this:

25 आॅगस्ट : कोकण म्हणजे गणेशोत्सव...कोकणात गणपती उत्सवाची धूम काही वेगळीच असते. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणाऱ्या सिंधुदुर्गातले गणेशभक्त नव्या शेता-भातातून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातायत.

ठिकठिकाणी आनंदी वातावरणात गणेशाचे घराघरात आगमन झालंय. काही लोकांनी कालच गणपती बाप्पाला आपल्या घरी आणले आहे. तर काही लोकांनी आज आणले आहे. बहुतांश लोकांचे घरी गणपतीचे आगमन झाले आहे. कोकणातील वाडी वस्तीवर पारंपरिक पद्धतीने गणपती डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरून गणपतीचे आगमन होत असल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.

शेतक-याला सुखी ठेवण्याचे साकडे सुद्धा घालण्यात येत आहे. कोकणातील गणपती सण सर्वात मोठा सण असल्याने सामूहिक पद्धतीने अनेक गावात एकाच दिवशी एकाच वेळी, पारंपरिक पद्धतीने गणपतीचे आगमन गावात होत आहे. दापोली तालुक्यातील खेडच्या गावात दरवर्षी सगळे गणपती शेताच्या बांधावरून डोक्यावरून गणपती भात शेतीच्या बांधावरून डोक्यावर गणपतीची मूर्ती आणली जाते. लाखो चाकरमानी गणरायाच्या सेवेसाठी कोकणात दाखल झाले आहे. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2017 10:31 AM IST

ताज्या बातम्या