पुणे, 12 फेब्रुवारी : पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलीय. उत्तर प्रदेशातून विमानानं येऊन घरफोडी करत पुन्हा विमानानं परत जायचं अशी या टोळीची कार्यपद्धती होती. या टोळीकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून चार लाख 68 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. या टोळीचे म्होरके महंमद आणि नफासत हे दोघं विमानानं पुण्यात येत होते.उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करायची आणि पुन्हा विमानाने परत जायचे, अशा पद्धतीने फिल्मी स्टाइलने घरफोडी करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून चार लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.