कर्नाटकातील एका बसमध्ये वानर बसच्या स्टेअरींग बसल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. हे वानर जेव्हा स्टेअरींग बसलंय तेव्हा या बसचालक ही बस चालवतोय. हा व्हिडिओ आपल्याला गंमतीशीर वाटत असला तरी हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कारण यावेळी या माकडामुळे जराही स्टेअरींगचा बॅलन्स बिघडला असता तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. परिणामी अनेक प्रवाश्यांना इजा झाली असती किवा यापेक्षा गंभीरही काही घडू शकलं असतं. त्यामुळे या व्हिडिओ नंतर कर्नाटक परिवहन विभागाने या बसचालकाला निलंबित केलं आहे.