मुंबई, 16 जानेवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी ते विधान मागेही घेतलं. दरम्यान, करीम लालाच्या कुटुंबीयांनी न्यूज18 लोकमतला प्रतिक्रिया दिली. इंदिरा गांधीच नाही तर राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंनाही करीम लाला भेटायचा असा दावा या कुटुंबीयांनी केला आहे. असाच दावा हाजी मस्तानच्या दत्तक पुत्रानंही केला आहे.