• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बंदुकीच्या धाकावर केला बँकेची कॅश लुटण्याचा प्रयत्न, पण...
  • VIDEO : बंदुकीच्या धाकावर केला बँकेची कॅश लुटण्याचा प्रयत्न, पण...

    News18 Lokmat | Published On: Nov 27, 2018 10:23 PM IST | Updated On: Nov 27, 2018 10:23 PM IST

    मुंबई, 27 नोव्हेंबर - कांदिवलीतल्या पूर्व लोखंडवाला परिसरात बंदुकीच्या धाकावर दोन युवकांनी विजया बँकेची कॅश लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. बँकेसमोर व्हॅन उभी करून एक कर्मचारी आणि गनमॅन पैसे भरण्यासाठी बँकेत जात होते. त्यावेळी अचानक 18 ते 20 वयोगटातील दोन युवकांनी त्यांच्यावर बंदूक रोखली आणि त्याच्याकडील कॅश लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न फसल्याने त्या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. 22 नोव्हेंबर रोजी घडलेला हा सर्व प्रकार बँकेजवळच्या एका सिसिटीव्हीत कॅमेरॅत कैद झाला आहे. कोणत्याची प्रकारचं नुकसान न झाल्यामुळे कॅश घेऊन जाणाऱ्या दोघांनी पोलिसात तक्रार नोंदविण्याचं टाळलं. मात्र, सिसिटिव्ही कॅमेरॅत कैद झालेली ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच, समता नगर पोलिसांनी कॅश व्हॅनमधील बँकेत पैसे घेऊन जाणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना सोमवारी बोलावून घेतलं आणि घटनेची नोंद केली. आता ते चोर नेमके कोण होते? याची याचा शोध पोलीस घेत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी