• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : काँग्रेसमध्ये पडझड सुरूच, साताऱ्यातील आमदार भाजपच्या वाटेवर?
 • VIDEO : काँग्रेसमध्ये पडझड सुरूच, साताऱ्यातील आमदार भाजपच्या वाटेवर?

  News18 Lokmat | Published On: May 31, 2019 10:59 PM IST | Updated On: May 31, 2019 10:59 PM IST

  विवेक कुलकर्णी, 31 मे : लोकसभा निवडणुकीत पानीपत झालेल्या काँग्रेसमध्ये पडझड सुरूच आहे. साताऱ्यातील माणखटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. गोरे यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह महाजन यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वीच गोरे यांनी संगमनेर इथं काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप प्रवेश इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असल्याची चर्चा रंगत असतानाच गोरे यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी