• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अबब.. जळगावात शिजलं 3 हजार किलो वांग्याचं लज्जतदार भरीत
  • VIDEO : अबब.. जळगावात शिजलं 3 हजार किलो वांग्याचं लज्जतदार भरीत

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2018 08:09 PM IST | Updated On: Dec 21, 2018 09:22 PM IST

    जळगाव, 21 डिसेंबर - प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 3 हजार किलो वांग्यांचं भरित तयार करण्याचा विश्वविक्रम केला. जळगावतल्या सागर पार्कवर भल्या पहाटे मोठा जाळ तयार करण्यात आला होता. ही सुरूवात होती एका विश्वविक्रमाची. यासाठी सकाळपासूनच सगळे झाडून कामाला लागले होते. जवळपास 10 पलंगाच्या आकाराच्या जागेवर कापसाच्या पराट्या पेटवून वांगी भाजून घेण्यात आली. या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी शंभरहून अधिक महिला आणि तरूण मंडळी सागरपार्कवर दाखल झाले होते. तर दुसरीकडे विश्वविक्रमी खिचडी शिजवणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर त्यासाठी लागणारा मसाला तयार करत होते. या विश्‍वविक्रमी भरीताची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. कसं शिजलं हे विक्रमी भरित, पाहुया हा लज्जतदार रिपोर्ट..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी