इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरीझम कॉर्पोरेशन लिमिटेडने फक्त 600 रुपयात संपूर्ण गोवा फिरण्याची संधी दिली आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही दोन बाजू फिरू शकता. उत्तर गोवा, दक्षिण गोवा असे दोन बाजू फिरू शकणार आहात. IRCTC ने दिलेलं हे पॅकेज एक दिवसाचं आहे. 'HOP ON HOP OFF GOA BY BUS' असं या पॅकेजचं नाव आहे. या पॅकेजचा बुकिंग तुम्ही IRCTC च्या वेबसाईडवर करू शकता. या पॅकजमध्ये तुम्ही बसच्या साहाय्याने एका दिवसात गोव्याचा सुंदर नजारा पाहू शकता. एका व्यक्तीसाठी 400 रुपयात उत्तर गोव्याचं पॅकेज उपलब्ध आहे. तर दुसरीकडे दक्षिण गोव्याचं पॅकेजचंही 400 रुपये आहेत. पण या पॅकेजमध्ये 600 रुपयात दोन्ही बाजू फिरायला मिळणार आहे.