S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात 200 फुटांचा तिरंगा फाटला म्हणून पोत्यात भरला
  • VIDEO : पुण्यात 200 फुटांचा तिरंगा फाटला म्हणून पोत्यात भरला

    Published On: Feb 7, 2019 04:22 PM IST | Updated On: Feb 7, 2019 04:24 PM IST

    अद्वैत मेहता, पुणे, 7 फेब्रुवारी : मोठा गाजावाजा करत पुण्यातील शनिवारवाड्यासमोर उभारलेला 110 फुटी तिरंगा फाटल्यानं तो उतरवण्याची वेळ आली. झेंडा खाली उतरविल्यानंतर कोणत्याही नियमांचं पालन न करता अक्षरशः तो पोत्यात भरण्यात आला. घडला प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो VIDEO न्युज18 लोकमतच्या हाती लागला आहे. या आधी कात्रज भागात 200 फुटी झेंडा फाटल्याने उतरवण्यात आला होता. लाखो रुपये खर्चून विक्रमी झेंडे उभे केले जातात. मात्र, वारा पावसामुळे ते फाटतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्चदेखील केला जातो. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या वॉर्डमध्ये आणि पालक मंत्री गिरीश बापट यांच्या मतदार संघात 16 डिसेंबर 2016 मध्ये हा 110 फुटी तिरंगा उभारण्यात आला होता. पिंपरी-चिंचवडमध्येसुद्धा असाच एक भव्य राष्ट्रध्वज उभा करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close