बरेली, 30 मार्च : सध्या देशभरात कोरोनाचा (Coronavirus) भीती पसरत आहे. त्यात राहण्याची व्यवस्था नसल्याने मजुर आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेलीत दुसऱ्या भागातून आलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना रस्त्यावर बसवून त्यांच्यावर एकत्रितपणे औषधांची फवारणी करण्यात आली. यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यावर अद्याप प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
INHUMAN:-Bareilly UP.
UP प्रशासन का अमानवीय चेहरा
बरेली ज़िले में दिल्ली, हरियाणा,नोएडा से आए सैकड़ों मज़दूरों और बच्चों को ज़मीन पर बैठा कर उनके ऊपर Disinfectant का छिड़काव किया गया,जिसके बाद बहुत सारे बच्चों ने अपनी आंखों में जलन की शिकायत की..via @Benarasiyaa pic.twitter.com/Hp1dqoN0x6
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, हरियाणा, नोएडा येथे काम करीत असलेले शेकडो मजुर आपल्या कुटुंबासह गावी परतले आहे. येथे मजुरांच्या कुटुंबीयांना अगदी महिला आणि लहान मुलांना रस्त्यावर बसवून सर्वांवर एकत्रित औषधांची फवारणी करण्यात आली. त्यानंतर अनेक लहान मुलांच्या डोळ्यांची जळजळ होत असल्याचे समोर आले. मात्र यापैकी कोणालाच रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही तर त्यांना घरी पाठविण्यात आले.
दुसरीकडे बिहारच्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांना घरी आल्यावर बंद करण्यात आले आहे. ते रडत आहेत आणि सुटकेची मागणी करीत आहेत. यासंदर्भात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या कहराशी लढण्यासाठी अशी भयंकर पद्धती वापरत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. खूप कष्ट आणि प्रयत्न केल्यानंतर हे मजुर आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यांना वेगळं ठेवण्याची ही पद्धती धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.