वडोदरा, 18 ऑगस्ट : देशात कोरोनाचा कहर असला तरी लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने रस्त्यांवरील गाड्यांची रहदारी वाढली आहे. लॉकडाऊनच्या तीन महिन्यात क्राईमबरोबर अपघाताचं प्रमाणही कमी झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अपघातंच प्रमाणही वाढलं आहे. अनेकदा गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत..त्यातून मोठी दुर्घटना घडू शकते, यामध्ये जीवही जाण्याची संभावना असते.
अशातच गुजरातमधील बडोद्याचा एक VIDEO समोर आला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ पाहून भीती वाटेल. या अपघातामुळे एका रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. Hit and run च्या या केसमध्ये भरधाव रिक्षा उजव्या बाजूला वळणाऱ्या एका कारला धडकली.
गुजरातमध्ये बडोद्यात एक विचित्र अपघात झाला. Hit and run च्या या केसमध्ये भरधाव रिक्षा कारला धडकली आणि त्याच वेळी समोरच्या बाजूने जाणाऱ्या जीपखाली आली. रिक्षाचालकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. रिक्षातली प्रवासी महिला मात्र थोडक्यात बचावली. पाहा थरारक VIDEO pic.twitter.com/5IpfIaqo2F
त्यानंतर रिक्षा विरुद्ध लेनमध्ये गेली. त्याचवेळी विरुद्ध लेनमधून एक गाडी भरधाव येत होती. त्या गाडीने रिक्षाला ठोकलं. रिक्षाने लेन बदलल्यानंतर यातील महिला प्रवासी रस्त्यावर पडली. रिक्षाचालकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षातली प्रवासी महिला मात्र थोडक्यात बचावली. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.