• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पेट्रोल पंपाचं मालक व्हायचंय? मग 'असा' करा अर्ज
  • VIDEO : पेट्रोल पंपाचं मालक व्हायचंय? मग 'असा' करा अर्ज

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2018 07:32 AM IST | Updated On: Dec 21, 2018 07:43 AM IST

    तुम्ही जर पेट्रोल पंप उघडायचा विचार करत असाल तर हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या इंधन कंपन्यांनी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आणली आहे. देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिटेल आऊटलेट डिलरचे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे डिलरशीप घेऊन लाखो रुपये कमवण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. हरियाणा, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, आसाम, केरळ, मणिपूर, मेघालय, नागालॅण्ड, ओडिसा, पाँडिचेरी, पंजाब, सिक्किम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, दिव-दमण, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये उघडू शकता तुम्ही पेट्रोल पंप.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी