उत्तर भारतातीलव अनेक शहरांत गारपीटीचा कहर बघायला मिळाला. तब्बल 2 तास दिल्ली, नोएडा आणि उत्तर भारतातील अनेक शहरांना मुसळधार पाऊस आणि गारांनी झोडपलं. गारपीटीच्या तडाख्यामुळे उत्तर भारतात अचानक वातारवरण बदललं, सकाळी स्वच्छ असलेलं आभाळ अचानक काळवंडलं आणि दुपारी दोनच्या सुमाराला गारपीटीला सुरूवात झाली. तब्बल 2 तास झालेल्या गारपीटीमुळं या भागात जम्मू काश्मीरसारखा पांढराशुभ्र बर्फ पसरल्याचं चित्र दिसत होतं. अचानक झालेल्या या गारपीटीमुळं उत्तर भारतात थंडीची लाट परतली आहे. लुधियानामध्येही जोरदार पाऊस झालाय. जम्मू कश्मीर मध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बद्रिनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली असून सर्वत्र बर्फाची चादर पांघरल्या गेली आहे. तर जम्मू काश्मीरच्या राजोरीमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर अक्षरशः बर्फाचे ढीग जमा झाले आहेत. वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे बर्फ बाजूल करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे.