• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये कोसळधार पावसाला सुरुवात, गावांना सतर्कतेचा इशारा
  • VIDEO: नाशिकमध्ये कोसळधार पावसाला सुरुवात, गावांना सतर्कतेचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 10:19 AM IST | Updated On: Aug 2, 2019 10:26 AM IST

    नाशिक, 02 ऑगस्ट : नाशिकचं गंगापूर धरण 85 % भरलं असून दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला विसर्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. चार हजार क्युसेक्स इतक्या प्रमाणात पाणी नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने सोडलं जात आहे. पुढील दोन दिवसात नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी