• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात थंडी परतली; सर्वाधिक थंड हवेचं ठिकाण म्हणून 'या' गावाची नोंद
  • VIDEO : राज्यात थंडी परतली; सर्वाधिक थंड हवेचं ठिकाण म्हणून 'या' गावाची नोंद

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 04:36 PM IST | Updated On: Jan 29, 2019 04:41 PM IST

    मुंबई, 29 जानेवारी : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडचा पारा 4 अंशापर्यंत खाली आला होता. थंडीची ही स्थिती पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. तर सर्वाधिक थंड हवेचं ठिकाण म्हणून निफाडची नोंद होऊ लागली आहे. नाशिकमध्येही थंडीचा कडाका वाढला असून, नाशिक आणि मालेगावचा पारा 8 अंश सेल्सीयस पर्यंत खाली आला होता, तर मनमाडमध्ये 9 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदलं गेलं. मध्य महाराष्ट्रासह विदर्भाच्या किमान तापमानासुद्धा लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर उपराजधानी पुन्हा गारठू लागली आहे. वर्धेचे तापमान 9 अंशावर आलं होतं. थंडीची तीव्र लहर असल्यामुळे पुढचे काही दिवस विदर्भाचा पारा 10 अंशापेक्षा खाली राहण्याचीही शक्यता आहे. मुंबईचं किमान तापमानही खाली उतरलं आहे. मोसमात दुसऱ्यांदा मुंबईकर हा अनुभव घेताहेत. या वाऱ्यांमुळे संध्याकाळसोबतच दुपारच्या वेळीही गार वाऱ्यांचा अनुभव येतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी