• VIDEO : दोन वाहनांच्या धडकेत 'तो' मध्येच सापडला

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2018 08:12 PM IST | Updated On: Aug 1, 2018 08:46 PM IST

    जोधपूर, 1 ऑगस्ट : सूर्यनगरी म्हणून ओळख असलेल्या राजस्थानच्या जोधपूरात सोमवारी एक विचित्र अपघात घडला. मसुरिया चौकात एका भरधाव कारने प्रथम एका स्कूटरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर दुसऱ्या कारवर जाऊन आदळली. ह्रदय हेलावून टाकणारी ही घटना चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चौक क्रॉस करत असताना समोरून आलेली कार पाहून स्कूटरवर स्वार श्याम सुंदर जरा अलीकडेच थांबले. तेवढ्यात मागु्न भरधाव आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की स्कूटरच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या उडाल्या. त्यानंतर ही ती कार चौक क्रॉस करत असलेल्या कारवर जाऊन आदळली. या धडकेत फेकल्या गेलेले श्याम सुंदर दोन्ही कारच्या मधे दबले. पण दैव बलवत्तर त्यांचे प्राण वाचले. पण त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी त्यांना तात्काळ एमडीएम रुग्णालयात भर्ती केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकाने भरधाव कार चालविल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading