• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आत आगीच्या ज्वाळा आणि धूर, जीव वाचवण्यासाठी होता एकच पर्याय पण...
  • VIDEO : आत आगीच्या ज्वाळा आणि धूर, जीव वाचवण्यासाठी होता एकच पर्याय पण...

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 08:44 PM IST | Updated On: May 24, 2019 08:44 PM IST

    सुरत, 24 मे : सुरतमधल्या कोचिंग क्लासला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत 30 हून अधिक जण अडकले होते त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला. आगीत आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांनी इमारतीवरून उड्या मारल्या आणि यात मुलांचा मृत्यू झाला तर काही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या आगीतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत देण्याचं गुजरातचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलयं. तर पंतप्रधान मोदींनीही दुर्घटनेतील मुलं बरी व्हावी असं ट्विट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी