हार्वर्ड स्कॉलर आणि अर्थतज्ज्ञ गीता गोपिनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून निवड झाली. मूळचे भारतीय स्कॉलर देशापासून दूर का जातात? त्यांना परदेशातल्या संधी का खुणावतात? भारतात त्यांच्या बुद्धिमत्तेची कदर केली जात नाही का असे प्रश्न गीता गोपिनाथ यांच्यामुळे पुन्हा विचारले जात आहेत. कोण होते असे इतर अर्थतज्ज्ञ ज्यांच्या गुणवत्तेची कदर करण्यास भारत मुकला?