S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अतिविषारी घोणसच्या 96 पिल्लांचा जन्मोत्सव
  • VIDEO : अतिविषारी घोणसच्या 96 पिल्लांचा जन्मोत्सव

    Published On: Jul 10, 2018 10:26 PM IST | Updated On: Jul 10, 2018 10:26 PM IST

    कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी गावातल्या कै. बाबूराव टक्केकर सर्पशाळेतल्या घोणस जातीच्या तीन मादींनी 96 पिल्लांना जन्म दिलाय. मादींकडून चार, आठ दिवसाच्या फरकांनी प्रत्येकी वीस ते चाळीस या प्रमाणात ही पिल्ले जन्माला आली आहेत एप्रिल महिन्याच्या दरम्यान या घोणस जातीच्या नर मादीचे मिलन होते आणि पुढे तीन साडे तीन महिन्यात मादी पिल्लांना जन्म देते. एक मादी तीस ते चाळीस पिल्ले जन्माला घालते. ही पिल्ले जन्माला येताच आईपासून विलग होतात. येत्या काही दिवसात नागपंचमीचा सण असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामध्ये या पिल्लांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय. आणि दरवर्षी नागपंचमीला मोठ सर्प प्रदर्शन या गावामध्ये भरवले जाते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close