• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वैज्ञानिकच निघाला माओवादी; केंद्र सरकारच्या संशोधन केंद्रात होता कार्यरत
  • VIDEO : वैज्ञानिकच निघाला माओवादी; केंद्र सरकारच्या संशोधन केंद्रात होता कार्यरत

    News18 Lokmat | Published On: Dec 24, 2018 06:06 PM IST | Updated On: Dec 24, 2018 06:13 PM IST

    नवी दिल्ली, 24 डिसेंबर : माओवादी संघटनेसाठी देशपातळीवर समन्वयकाच्या भुमिकेत वारणाऱ्या माओवीद्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे केंद्र सरकारच्या जियोफिजीकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तो वैज्ञानिक पदावर कार्यरत होता. नक्का वेंकटराव उर्फ मुर्ती नावाहा या वैज्ञानिकाला दिड लाख रुपये पगार असुन 1980 पासुन तो माओवादी चळवळीत सक्रीय होता. माओवादी चळवळीसाठी शस्त्रसाठ्यासह विस्फोटके तसेच इतर साहित्य पुरवण्यात नक्का वेंकटरावची मुख्य भुमिका होती. प्राप्त माहितीच्या आधारे छत्तीसगड पोलीसानी त्याला महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर बाघनदीजवळ अटक केली. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तेलतुंबडे याला काही साहित्य पुरवण्यासाठी तो आल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या संशोधन केंद्रात वरिष्ठ पदावर काम करणारा मुर्ती आतापर्यंत सुरक्षा यंत्रणेला कसा सापडला नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी