• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिकचा गांधीतलाव भरला काठोकाठ; पर्यटक घेताहेत नौकानयनाचा आनंद
  • VIDEO : नाशिकचा गांधीतलाव भरला काठोकाठ; पर्यटक घेताहेत नौकानयनाचा आनंद

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 04:40 PM IST | Updated On: Feb 7, 2019 04:40 PM IST

    नाशिक, 7 फेब्रुवारी : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकचा गांधीतलाव तुडुंब भरला असून, या तलावात पुन्हा नौकानयन सुरू झालंय. रामकुंडावर येणारे भाविक आणि गोदातीरावर येणारे पर्यटक याचा आनंद घेताहेत. शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीचा हा परीसर कायम गर्दीनं फुलला असतो. रामकुंड, लक्ष्मण कुंड,सीता कुंड यासह गंगा-गोदावरी या पुरातन मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी याठिकाणी कायम असते. यालाच लागून असलेला हा गांधीतलाव म्हणजे पर्यटकांची आवडती जागा. गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी रोखल्यानं या तलावातील नौका पर्यटन पुन्हा सुरू झालंय. पुन्हा एकदा बोटिंग सुरू झाल्याने नौकानयनासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दीत होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी