• होम
  • व्हिडिओ
  • Live Video: भिवंडीत अज्ञाताने पेटवून दिल्या दुचाकी
  • Live Video: भिवंडीत अज्ञाताने पेटवून दिल्या दुचाकी

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2018 09:38 AM IST | Updated On: Oct 26, 2018 09:39 AM IST

    गेल्या काही दिवसांपासून भिवंडीत सुरू असलेलं दुचाकी जाळण्याचं सत्र थांबताना दिसत नाही. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा भिवंडीत दुचाकी जाळण्यात आल्या. शहरातील हनुमान नगर परिसरातील दत्त मंदिरासमोर पार्क करून ठेवलेल्या दुचाकींना अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. ही घटना घडताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. मात्र अग्निशमन दल दाखल होईपर्यंत या आगीत चार दुचाक्या आणि एक सायकल जळून खाक झाली. सतत घडणाऱ्या या जळीतकांडांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading