• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जॉर्ज फर्नांडिस यांचं कार्य एखाद्या हिरो प्रमाणे -संजय राऊत
  • VIDEO : जॉर्ज फर्नांडिस यांचं कार्य एखाद्या हिरो प्रमाणे -संजय राऊत

    News18 Lokmat | Published On: Jan 29, 2019 11:41 AM IST | Updated On: Jan 29, 2019 11:52 AM IST

    मुंबई, 29 जानेवारी : मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. जॉर्ज फर्नांडिस यांचं कार्य एखाद्या हिरो प्रमाणे होतं अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर संजय राऊत यांच्यासह उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनीही व्यक्त केलेल्या शोककळा..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading