S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भरसमुद्रात 'बर्निंग बोटी'चा थरार, एकाचा होरपळून मृत्यू
  • VIDEO : भरसमुद्रात 'बर्निंग बोटी'चा थरार, एकाचा होरपळून मृत्यू

    Published On: Sep 5, 2018 11:28 PM IST | Updated On: Sep 5, 2018 11:28 PM IST

    विनया देशपांडे, कारवार, 5 सप्टेंबर : आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास कारवार इथं एक मासेमारी करणाऱ्या बोटीवर भीषण आग लागली होती. जलपद्मा असं या बोटीचं नाव होतं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. नौदलाच्या फास्ट इंटरसेक्शन क्राफ्ट (एफआयसी) ने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. इंजिन रुममध्ये स्वयंपाकाच्या केरोसिन स्टोव्हचा स्फोट झाल्याने बोटीला आग लागली होती. या दुर्घटनेत बोटीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close