Elec-widget

ठाण्यात मोठा अनर्थ टळला, अग्निशमन दलानं वाचवले 140 जणांचे प्राण

ठाण्यात मोठा अनर्थ टळला, अग्निशमन दलानं वाचवले 140 जणांचे प्राण

ठाण्यात रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

  • Share this:

अजित मांढरे (प्रतिनिधी)ठाणे, 14 नोव्हेंबर: ठाण्यामध्ये शुक्रवारी सकाळा सुदैवानं आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. वागळे इस्टेट लुईसवाडी येथील श्री राज दर्शन सोसायटी अचानक लहान स्फोटाचे आवाज येऊ लागले. सोसायटीच्या ४० पेक्षा जास्त इलेक्ट्रीट मीटर मध्ये आग लागली होती. पाहाता पाहता आगीनं रौद्र रुप धारण केलं.या सोसायटीतील १४० पेक्षा जास्त रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता मात्र ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि ठाणे अग्नीशमन दलाच्या जवांनी आपला जीव धोक्यात टाकून सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश जवानांना यश आलं आहे. सध्या या इमारतीमधील सर्व नागरिकांना बाहेर काढलं असून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ठोस कारण समजू शकलं नाही. वेळीच जर आपत्ती कक्षाचे आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: thane
First Published: Nov 15, 2019 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...