विशाखापट्टणम, 01 मे : 'फानी' नावाचे चक्रीवादळ शुक्रवारपर्यंत ओडिशामधील पुरी आणि केंद्रपाडादरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्ये समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तितली चक्रीवादळापेक्षा हे वादळ जास्त तीव्र असण्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 175-185 ते 205 किमी प्रति तासाच्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.