मुंबई, 20 मे : पश्चिम महाराष्ट्र हा खरंतर कधीकाळीचा काँग्रेसचा बालेकिल्ला पण एक्झिट पोलनुसार याच प्रदेशात काँग्रेसला साधा भोपळाही फोडता येणार नाही. याउलट त्यांचेच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने मात्र, पश्चिम महाराष्ट्रातलं आपलं प्राबल्य यावेळीही अबाधित ठेवल्याचं बघायला मिळतं आहे.