मुलुंड, 10 फेब्रुवारी : चिंतामणराव देशमुख उद्यानमध्ये मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने पूर्व उपनगरात प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनात झाडं, फुले, फळे आणि भाज्या यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. यात विविध रंगीबेरंगी फुलं, झाडे तसेच फुलझाडांनी सजवलेली वाद्य, श्रवणीय संगीत, मंडप आणि विविध सामग्रीने हे उद्यान भरून गेलंय. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत.